एक जे सुरेख फूल

 

एक जे सुरेख फूल वाटले मला ,
ते कसे जिणेच भार जाहले मला ?

 

मी कशावरून ओळखायचे ऋतू ?
चेहर्‍यांविनाच सर्व भेटले मला !

 

जायचीस तू जरी खुणावुनी तशी ,
ना कळायचे कधीच त्यातले मला .

 

का मला मधेच सोडलेस एकटे ?
शोधती अता तुझीच पावले मला !

 

कोरडीच राहिली म्हणून पापणी . .
दु:ख येतसे पिता मनातले मला !

 

.

प्रतिक्रिया टाका