एकदा . . .

(video)

हत्तीनं एकदा

बूट घातले

फसकन् पाय

बाहेर आले . . .

 

चित्त्यानं एकदा

प्यान्ट  शिवली

एका उडीत

उसवून गेली . . .

 

सांबरानं एकदा

टोपी आणली

शिंगात अडकून

भोकं पडली . . .

 

उंटानं एकदा

चढवला कोट

पाठीची टेकडी

नि पोटाची मोट . . .

 

जिराफानं एकदा

बांधला टाय

हसायचं नाही

तर, करायचं काय ?

प्रतिक्रिया टाका