एकटीचा खेळ . .

– मी एकटी असली म्हणजे
सांगू कोणता
खेळ खेळते . . ?

 

बाबांची चप्पल हळूचकन्
मी माझ्या
पायात घालते !

 

– सईल-बिईल झाली तरी
थोडं थोड
चालून बघते . .

 

जमलंबिमलं नाही तर
दोन्ही पाय
एकीत कोंबते !

 

– भिंतीचा मी हात धरून
घरभर
फिरून येते . .

 

उडया मारून पडल्यावर
बाबांच्यावर
चिडून जाते !

 

 

प्रतिक्रिया टाका