एकटा . .

एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे . .
फक्त माझे गीत माझ्यासोबती येणार आहे . .

 

मी तुम्हाला घ्या म्हणालो
ते कुठे होते स्वतःचे
मी तुम्हाला द्या म्हणालो
ते तरी होते कुणाचे
शून्य मी माझे दिले ते शून्य मी नेणार आहे . .

 

सागराला मी अखेरी
आसवे वाहून देतो
येथल्या मातीत माझा
देहही ठेऊन जातो
ऐक वार्‍या , श्वास माझे मी तुला देणार आहे . .

 

वेळ आयुष्यात होती
तेवढी झाली पुरेशी
दशदिशांची बंधनेही
जाहली मजला नकोशी
मागच्यांसाठीच आता मी दिशा होणार आहे. .

 

 

प्रतिक्रिया टाका