इवले गाणे . . .
ओठावरती आली गुणगुण
झाले इवले गाणे
मोर नाचतो तसे देखणे
नाचू आनंदाने . .
करा साखळी उचला पाउल
झुकझुक गाडी वळणे घेइल
तिकिटे काढा . . वेलींवरची हिरवी हिरवी पाने . .
गिरवित जाती फूलपाखरे
वेलांटीची रंग-अक्षरे
ओठ शिवा बोटांनी गुपचुप पकडू उडती राने . .
मनांतून व्हा उंचउंचसे
नभात उभवा हात जरासे
तरंगणार्या ढगांस लुटुनी घ्या किरणांचे सोने . .
निळ्या तळ्याच्या काठावरती
वाकुनि थोडे बघा खालती
पाण्यावरचा फोटो पाहुन खुदकन गाली हसणे . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा