इतके सुंदर गीत . .
लक्षणे : एकूण मात्रा २४ ( प +प + प ) . प म्हणजे ८ मात्रा
इतके सुंदर गीत कसे मी लिहून गेलो ?
लिहिण्यासाठी टाक विजेचा करून गेलो !
उंची पादत्राणे दिसता तुझ्या घराशी ,
अनवाणी जो आलो होतो , निघून गेलो !
मजला त्यांची पटली नव्हती जरी तयारी ,
हिरमुसल्या शब्दांना मी ‘ गा ! ‘ म्हणून गेलो !
अजुन कुठे ओतून तुला तू दिलेस पुरते ?
अजुन कुठे मी काठ बुडेतो भरून गेलो ?
धुमसत असता मी एकांती इथे कधीचा . .
कळले नाही , केव्हा जळलो . . विझून गेलो !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा