इंद्रधनुष्य . .

त्या फांदीवर
पिवळीजर्द पानं होती . . तशी काही
हिर्वीकंच !
किरमिजी . . सोनेरी
पोपटी . . शेंदरी
नवी पानं चुळबुळ करीत होती
आकाशाकडे अधीरतेने पहात होती .

 

पिकलेलं पान
जवळच्या पानाला
डुगुडुगु मान हलवीत म्हणालं –
‘ आकाशानं मांडलेलं इंद्रधनुष्य
पहायचंय् त्यांना . .
आपण त्यांच्या आड येतोय ! ‘
‘ . . नाहीतरी , हा पावसाळा
आपलाही शेवटचाच गड्या ! ‘
दुसरं पानं बोललं , ,

 

— टप् टप् करीत
क्षणात दोन ठिपके
रानमातीवर सांडून गेले . .
इंद्रधनुष्यातला
पिवळा रंग
अधिकच गडद झाला !
————————————————–
कवी : वा. न. सरदेसाई
————————————————-

प्रतिक्रिया टाका