आशीर्वाद

वेदनेचे झाड
होऊनिया गेले
जिव्हारी फुललो
जखमांनी . .

अंगी गोंदलेल्या
हिरवळ –  खुणा
तेवढा पुराणा
आशीर्वाद !

प्रतिक्रिया टाका