आयुष्य मी विजेचे जगलो मनाप्रमाणे . .
मात्रावृत्त : रसना
लक्षणे : [ गा l गालगाल l गा + , गा l गालगाल l गा + ]
+ म्हणजे निश्चित गुरू .
आयुष्य मी विजेचे जगलो मनाप्रमाणे . .
उजळून जग क्षणी त्या , विझलो मनाप्रमाणे !
माझा विनोद जेव्हा कळला न पंडितांना ,
गंभीर चेहर्यांना हसलो मनाप्रमाणे !
केला कुठे कधी मी उपहास जिंकल्यांचा ?
मी मात्र झुंजताना हरलो मनाप्रमाणे !
दिसला वसंत . . तो ही लांबून पाठमोरा . .
मग , बाळगीत काटे फुललो मनाप्रमाणे .
सारी हयात माझी त्या लक्तरांत गेली . .
नसुनी जगात आता सजलो मनाप्रमाणे !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा