आम्ही कोल्याची पोरं
आम्ही कोल्याची पोरं पितो दर्याचं वारं ..
सरा सकाली शेंदरी
कुनी वाटंनं टाकला
लाल मंगलोरी कौलावं
कसा गुलाल फाकला
पिवल्या उन्हाच्या कांडीनं झाली सोन्याची दारं . .
घराघराला लागून
वल्या वालूचं आंगन
लाट हलूच येऊन
जाय रांगोली काढून
सात रंगांनी माखलं शंख- शिंपल गुल्जार . .
मार हिरव्या हातांनी
निलं आकाश झेलती
दुधासारकं चांदनं
परं किनार्या वरती
कंदी रातंचं भेटाया येती उतरून तारं . .
आमी होरीच्या पायानं
समिंदरावं चालतो
मासं चांदीचं चवदार
करंडी भरून आनतो
दिवं घेऊन दोल्यांत उबा सांजंचा अंधार . .
आम्ही कोल्याची पोरं पितो दर्याचं वारं
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा