आभाळाशी जुळल्या तारा . .

मात्रावृत्त : कर्णफुल्ल
लक्षणे : एकूण मात्रा १६ ( प l प ) , यति आठव्या मात्रेवर .
छंदोरचना पृष्ठ क्र. ३९२

आभाळाशी जुळल्या तारा . .
निढळाच्या श्रावण – जलधारा !

लाटे , तू मजला समजुनि घे . .
तू चंचल . . मी ठाम किनारा !

पीस तेवढे दे पडलेले . .
मोरा , मागत मी न पिसारा !

दिसतेस रोज तू ओझरती
बांधतेस पायी का पारा ?

होते राख जळो कोणीही . .
होतो एखादा अंगारा !

प्रतिक्रिया टाका