आपण मोठ्ठे व्हायचं . .
आईबाबांसारखे
आपणे मोठ्ठे होऊ
स्कूटरवरून भुर्रकन्
शाळेला जाऊ . .
अंगावरती झेलायच्या
ओल्या ओल्या सरी
नाचायचं हं, पावसात
मोट्ठे असलो तरी. .
तुझ्या-माझ्या डायर्यांची
कोरी पानं फाडू
कागदाची मग एकेक
नाव पाण्यात सोडू . .
– अभ्यास नको म्हणून
आपण मोट्ठ व्हायचं
तोपरेन कुण्णालाच
कळू नाही द्यायचं !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा