श्री.संदिप माळवी
गझल
आता दिव्याप्रमाणे जळतात लोक येथे
पेटून ऐनवेळी विझतात लोक येथे
विसरुन धर्मजाती जे काल एक होते
वैर्याप्रमाणे अता ते लढतात लोक येथे
पैशात चालतो हा व्यवहार ह्या जगाचा
कैसे इमान अपले विकतात लोक येथे
कुरवाळले जयांना मी ही फुलाप्रमाणे
काट्यापरी अता ते सलतात लोक येथे
दुखा:स सांगतांना इतके मला कळाले
अश्रु गुमान अपुले गिळतात लोक येथे
उन्मत्त वादळांनी आता खुशाल यावे
त्याला खुल्या दिलाने , भिडतात लोक येथे
मेल्यावरी कशाला करतात शोक सारे ?
मेल्यावरीच सारे कळतात लोक येथे.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा