आठवण . .

निळं आभाळ
हिर्व्यागर्द रानाशी
बोलत होतं . .

 

: तुझ्या
सावलीदार अंगणात
चुकार गुरूं
थकून भागून बसलं आहे ,
कास भरू दे

 

अरे , तू – मी तापलो
तरी काय
बिघडणार आहे ?

 

. . गुराच्या वासरागत
आपली आठवण
कोण काढणार आहे ?

 

—————————————
कवी : वा. न. सरदेसाई

प्रतिक्रिया टाका