आज नटून का हवा . .

 

आज नटून का हवा वाहतसे सुरेखशी ?
की गजरे तिथे परी माळतसे सुरेखशी ?

 

आठवणी जमावया लागत ना निमित्तही . . .
शीळ उनाड पाखरू घालतसे सुरेखशी !

 

पत्र तुझे जपून मी ठेवियले मनामघे
ओळ नि ओळ झाकली वाचतसे सुरेखशी .

 

बिंब तुझे नदीवरी येइ जसे नहावया ,
काठ तरंगती मिठी मारतसे सुरेखशी !

 

हात उभारुनी दुरी तू मजला खुणावता ,
खूण नव्हे … तुझी छबी पाहतसे सुरेखशी !

 

शीतल सावली तशी साथ मिळे तुझी मला . . .
वाट अता उन्हातही चालतसे सुरेखशी !

 

 

प्रतिक्रिया टाका