आजोबांच्या वेळी
माझे आजोबा किनई
जेव्हा लहान होते
आपल्यासारखे ते पण
शाळेत जात होते . .
ते म्हणतात . . त्यांच्या वेळी
वह्या पेनं नव्हती
दगडी पाट्या पेन्सिली
बोरू आणि दौती . .
मिशीवाली मुलं तेव्हा
वर्गामध्ये असत
देवासारखी गपचिप
गोणपाटावर बसत . .
मास्तर कधी मारतील
त्याचा नेम नसे
आजोबांचा रोज रोज
हात दु:खत असे . .
छ्डीवर लक्ष ठेवून
शिकायला लागे
कारण त्याच वेळी
मास्तर असत जागे . .
छडी हातात घेऊनच
मास्तर घेत झोपा
तेव्हा कुठे अभ्यास
वाटायचा सोपा !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा