असूया . .

हिर्व्या रानात पानांत
फुलं चांदण्याची आली
आभाळात पुनवेची
आज कूस उजवली . .

 

दाटे , असूयेच्या पोटी
मनी गडद अंधार
शुभ्र घडीला राहिली
एक अवस गर्भार . .

————————————————–
कवी : वा. न. सरदेसाई
————————————————-

प्रतिक्रिया टाका