अलगूज . .
मावळतीपलीकडील
आपल्या
सात रंगांच्या विश्वात
सप्तसुरांची मोहक झुंबरं
टांगून ठेवावीत , म्हणून
गुराख्याच्या अलगुजावर
सूर्य
टपलेला असतो !
. . अलगूज वाजंल की ,
पहाटहोते . . सूर्य जागा होतो . . .
रानाला भुरळ घालतो .
सोनेरी दान देतो ..
. हळूहळू
सुरांसाठी हात पसरतो .
. . रान हसत असतं
अगदी मनापासून _
सूर ऐकता ऐकता
सूर्य भान विसरतो . .
हाती न लागलेले सूर
कानांत साठवीत
सूर्य
जड पावलांनी
निघून जातो . .
एकेक दिवसअसाच जातो . .
रान काही गुराख्याचं अलगूज
सूर्याला द्यायला तयार नसतं !!
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा