अर्धे गेले दूर . . आयुष्य माझे . .

अक्षरगणवृत्त : शालिनी
गण : गागागागा ! गालगा गालगागा
छंदोरचना पृष्ठ क्र. २२१ / ११७

 

अर्धे गेले दूर . . आयुष्य माझे . .
श्वासांचा कापूर . . अयुष्य माझे !

 

मस्ती होती चांदण्यांना , फुलांना . .
तारुण्याचा नूर . . आयुष्य माझे !

 

शब्दांना तू माझिया साथ देता ,
गाती साती सूर . . आयुष्य माझे ,

 

दोघे होतो टाचलेलो मिठीने . .
अन् संसारी चूर . . आयुष्य माझे !

 

आले . . गेले पावसाळे , उन्हाळे . .
काळाला मंजूर . . आयुष्य माझे !

 

मुक्कामाची वेळ आली सराया . .
सांजेचे काहूर . . आयुष्य माझे .

 

अज्ञाताच्या केवढ्या गूढ वाटा !
की , हा माझा धूर . . आयुष्य माझे ?

 

.

प्रतिक्रिया टाका