अनंताचे वेड . .

पावलांनी माझ्या
रांगते धरणी
माझ्यात पोहते
सागराचे पाणी . .

 

तेजाला कोंडले
माझ्या पापणीत
वारियाचे वेग
ठेविले मुठीत . .

 

निळ्या आकाशाची
झोळी काखोटीला
भिक्षेत गावले
चंद्र सूर्य मला . .

 

खुशाल भिर्कवा
तार्‍यांचे दगड
मला जडले रे ,
अनंताचे वेड !

 

 

प्रतिक्रिया टाका