अंतरीचे बंड मी . .

वृत्त : मंजुघोषा
गण : गालगागा गालगागा गालगागा

 

 

अंतरीचे बंड मी मोडून आलो . .
कातडे डोळ्यांवरी ओढून आलो !

 

 

संपला बेवारशी तारा मघाशी ;
त्यावरी माती हळू लोटून आलो !

 

 

एवढी स्वप्ने कशी आता फुलावी ?
राहिलेले श्वासही मोजून आलो .

 

 

ज्या फुलांनी दंश गंधांतून केला ,
तेथले आकाश मी पोळून आलो !

 

 

पाहिले काचेत खोट्या रूप माझे
अन् जगाचे आरसे फोडून आलो !

 

 

प्रतिक्रिया टाका