अंतरातुनी रंगताच मी . .

सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त : कामदा
लक्षणे :गालगाल+ गालगाल+
+ म्हणजे निश्चित गुरू .
छंदोरचना पृष्ठ क्र. ४०९

 

अंतरातुनी रंगताच मी . .
चाललो कुठे एकटाच

 

प्रेमपत्र की गझल ती तुझी ?
शेर वाचले चार – पाच मी !

 

विस्मृतीतही विसर ना तुझा . .
व्हायचे बरे का उगाच मी ?

 

आपसूक ते दार उघडते . .
हाक मारता एकदाच मी .

 

आरसा नसे आज मी तुझा . .
एक आंधळी भग्न काच मी !

 

.

प्रतिक्रिया टाका