” अंगाई ते गझल – रुबाई ” समग्र वा. न. सरदेसाई पुस्तक प्रकाशनसमारंभी : डॉ.श्री. राम पंडित

” अंगाई ते गझल – रुबाई ” समग्र वा. न. सरदेसाई  ह्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना डॉ.श्री. राम पंडित म्हणतात :

 

_________ सुरेश भट हे गझल लिहिण्याकडे प्रवृत्त झाले असावेत . सुरेशभटांनी जवळपास ४० वृत्त वापरली असतील . श्री. वा . न. सरदेसाईंनी जवळपास ९० वृत्त्ते एकंदरीत वापरली आहेत. ती वृत्ते इतकी शास्त्रशुद्ध वापरली आहेत की तिथे कोणीही लघु गुरू  वर्णांपैकी एकही चूक काढू शकणार नाही. ते त्याबद्द्ल इतके दक्ष असतात की ते वारंवार कनफर्म करीत असतात की ते बरोबर आहे की नाही. अर्थात  वृत्तामधे ज्यावेळी प्राचीन काव्याचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम नाव येते ते मोरोपंतांचे.  मोरोपंतांना जास्त वाखाणण्यात आले ते वृत्त आणि छंदांमुळे. कदाचित त्यांच्या काव्यामधे असलेला रस , भाव ह्याचा विचार कमी झालाय . समीक्षकांनी तो केलेला दिसत नाही. पण कोणत्याही वृत्तामधे , छंदामधे काव्यरचना करण्याची असाधारण क्षमता ही मोरोपंतांमधे होती आणि इतक्या वर्षांनी जर आज बधितलं तर ती क्षमता श्री. वा. न. सरदेसाईं ह्यांच्याच काव्यात आढळते. निदान त्यांना गझलचे मोरोपंत ( गझल शास्त्राचे )  म्हणायला हरकत नाही. गझलमधे मराठीत एवढी वृत्ते माझ्या पहाण्यातजे मान्यवर ह्या शतकातील उर्दू गझलकार आहेत त्यांनीदेखील वापरली नाहीत. गालीबनेसुद्धा चाळीसच्या वर वृत्ते वापरली नाहीत. आधुनिक छंदशास्त्राचे  ज्ञाते आहेत व गझलकारही आहेत त्यांत सुद्धा ५० च्यावर वृत्ते कुणीही वापरलेली नाहीत.

वृत्तात एक असते , वृत्तात तर लिहितो माणूस पण त्याचे गण पाडून त्यात गेयता येतेच असे नाही. आजही काही छंद व वृत्तात जे लिहितात त्यात गण व यतिभंग फार असतो त्यामुळे गेयतेवर परिणाम होतो. मात्र वा. न सरदेसांईंच्या समग्र काव्यात , गझल काव्यात विशेषत  हा दोष कुठेच आढळत नाही. त्यांची पहिल्यांदा ज्यावेळी श्री. सुरेश भटांच्या ” मेनका”तील पहिल्याच गझलला निर्दोष गझल म्हणून वाखाणणली होती. अन्यथा सुरेश भट हे स्पष्टपणे गझल नाकारणारे होते.

गझल हाच एकच फॉर्म नव्हे , आजकाल त्यांना गझल व रुबाई हा फोर्म आवडला आहे , भावला आहे पण त्या पूर्वी त्यांनी मराठीत असलेले लोकप्रिय असलेले सारेच काव्यप्रकार हातळले. मुख्यतः वा. न. सरदेसाईंनी लावणी हाताळली ह्याचेतर मला आशर्यच वाटले . छान लावण्या आहेत . प्रश्नच नाही.भक्तिगीत . ह्यात , त्या त्या वृत्तीशी त्यांनी तादात्म्य साधले आहे , त्यात एकरूप झाले आहेत. त्या वृत्ती – भाववृत्तीमधून अंगाईगीत , विशेषतः बालगीते . बालगीते त्यांनी वयाच्या पन्नाशी नंतरही लिहिली आहेत . आणि ह्या वयात बालवृत्तीशी एकरूप होउन तादात्म्य साधून तितक्यच सहजपणे त्या वयाला अनुरूप अशी शब्दरचना करणे , भाववृत्तीशी तादात्म्यसाधून त्यांचे भाव कवितेत मांडणे हे सर्वथा अशक्य वाटते काहीवेळा . मात्र ,ही किमया त्यांनी साधली आहे.त्यांच्या वीरवृत्तीतल्या कविता असोत , बालगीते असोत , अंगाईगीत असो की कोळीगीत असो . एवढा शब्दसंग्रह त्यांच्याकडे आहे आणि मराठी वृत्ते तर त्यांना वश झाली आहेत. ह्यात काही प्रश्नच नाही. आता ते गझल व रुबाईच्या प्रमात पडल्यामुळे त्यांचे गीतांकडे व इतर काव्यप्रकारांकडे दुर्लक्ष होतय तेही दिसतंय .

गझलकाव्य हे सूत्रबद्ध काव्य आहे. कोणतीही गोष्ट अंत्यत्य सुसूत्रपणे त्यात मांडता आली पाहिजे . गझलीयत ही जी गोष्ट आहे ती शब्दांत व्यक्त करता येत नाही , त्याची व्याख्या करता येत नाही.पण ती सादरीकरणामधे ती कवितेपक्षा व  गीतापेक्षा कसदार असते. सर्वथा तिचे स्वरूप भिन्न असते . त्यात काहीतरी वेगळेपण आपल्याला जाणवतो आणि हे विशेषतः उर्दू गझलेत पटकन जाणवते. मराठीत हे पटकन जाणवणार नाही. पण हळूहळू ही गझलेत हल्ली येतेय. जे चांगले कवी आहेत , चांगले गझलकार आहेत त्यांच्या गझलेत ही गझलीयत आढळते आहे. वा. न. सरदेसाईंच्या गझलेत ही गझलीयत सहजपणे जाणवते. त्यांच्या गीतामधील व गझलेमधील  फरक हा सहजपणे जाणवतो . गझल हा काव्यप्रकार , कवितेच्या तुलनेने किंवा गीताच्या तुलनेने वेगला किंवा वरचढ आहे  असे मी  मानत नाही . गझलेमधे महाकाव्य संभवत नाही . गझलेचा मुळ गाभाच हा प्रेम आहे. प्रेमाशिवाय अन्य विषयावर गझल लिहू शकत नाही असे नाही. पण ती प्रेमाच्या ______अनुषंगाने __ भक्तिचे असो, ममतेचे असो पण त्याचा केंद्रीय विषय हा मनुष्य असतो व तोच असायला हवा. त्याच्यात दलित कविता /गझल येऊ शकत नाही. दलित काव्याला अभिप्रेत असणारा लाऊडनेस , नकारात्मक भूमिका व आक्रोश गझलेत मांडता येणार नाही. गझलेची प्रकृती अत्यंत अलवार आहे , नाजूक आहे. त्यात अलवार शब्दच यायला हवेत. त्यामुळे गझलेच्या जशा मर्यादा आहेत तशी ती गझलेची ताकदही आहे .सूत्रबद्धता ही गझलेची ताकदही आहे. आणि काव्यात असे आहे की कवितेत , विशेषतः गद्य कवितेत महाकाव्याची शक्यता जास्त असते. छंदोबद्ध काव्याला मर्यादा पडतात. छंदोबद्ध काव्यात उस्फूर्तता कमी असते. उस्फूर्तपणे छंदोबद्ध काव्य लिहिले तर चांगलीच गोष्ट आहे पण असे सहसा होत नाहे. ज्यावेळी पाच किंवा सहा शेर लिहिता त्यावेळी तुम्हाला यमक शोधावे लागतात. गझलमध्ये यमक व अंत्ययमक ही महत्त्वाची बाब आहे व ते काफिया शोधताना तुम्ही ते काफिये  चालवण्यासाठी , निभावण्यासाठी , गझलेत ओवण्यासाठी प्रयास केले आहेत असे जाणवता कामा नये. असे जाणवल्यास ती गझल खोटी  ठरते. मग त्यवेळी समीक्षक जी टिका करायची ते करतात.____ आणि उस्फूर्तपणे ____________. पण तुमची खुबी ही आहे की ते विचार , ते काफिये इतक्या सुरेखणे मांडले पाहिजेत की त्यात कृत्रिमता असल्याचा वाचकाला /श्रोत्याला आभास होता कामा नये. वा. न. सरदेसाईंच्या गझला वाचतांना हे लक्षात येईल की इथे कृत्रिरीमतेचा लवलेशही नाही आणि त्यांचे शेर  हे उस्फूर्तपणे आले आहेत हे स्पष्टपणे जाणवतेआणि जर त्यांनी ते रचले असतील प्रयासाने तरीही त्यात कृतीमता आढळत नाही हे त्यांचे विशेष आहे. कारण त्या विषयाशी तादात्म्य साधून त्या वृत्ताची लय अंगी बाणवणे व त्यानंतर त्यांची ती गझल साकारते. हेच त्यांच्या इतर कवितांच्या बाबतीत जाणवते. त्यांच्या समग्र कविता ह्या ज्यावेळी मी वाचल्या त्यावेळी जाणवली की  मूळ चांगला कवी असल्याशिवाय तुम्ही गझलच काय कोणतेही काव्य लिहू शकत नाही. सुरेश भटांचे म्हणणे आहे की गझल लिहिणारा हा मूळ चांगला कवी असला पाहिजे . अहो , गझलच नव्हे तर गीत लिहायला ही तो चांगला कवी हवा व कविता लिहायलाही तो चांगला कवीच हवा. गझल हा काव्याचाच एक प्रकार आहे , काव्य अभिव्यक्तीचा एक प्रकार आहे .पण त्या बरोबरच तो मूळ कवी असला तरी त्याची अभिव्यक्ती , शैली कवितेपुरती _____________.

रुबाई हा अत्यंत क्लिष्ट काव्यप्रकार वा. न. सरदेसाईंनी ज्या सहजपणे आढळला आहे , त्यानंतर मराठीत रुबाईची दोनतीन पुस्तकेही आली  परंतु वा. न. सरदेसाईंनी जे विषय इतक्या सहजपणे रुबाईमधे मराठीत प्रथमतः मांडले आहेत त्याचा समग्र समीक्षकांनी वेगळा विचार करायला पाहिजे कारण तो छंदशास्त्रीय विचारच नव्हे तर रुबाईच्या अनुशंगाने त्यातला जो विचार – सुत्रबद्ध विचार आहे त्याचा एक अलग विचार व्हायला हवा.

जर कोणाला ( स्टुडंटला )  छंदशास्त्राची व काव्याची आवड असेल तर वा. न. सरदेसाईंची समग्र कविता  हा विषय प्रबंधासाठी अत्यंत उपयुक्त विषय ठरेल असे मला वाटते.

मी  त्यांच्या काव्यप्रवासाला शुभेछा देतो व दोन शब्द संपवतो .

 

वक्ते : डॉ. श्री. राम पंडित .

 

 

प्रतिक्रिया टाका